नंदुरबार येथे बस व मोटारसायकलची जोरदार धडक , महिला गंभीर जखमी 

0
206

नंदुरबार शहरात भरदार रस्त्यावर बस व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. अपघातात महिलेला गंभीर जखमी झाली तर पुरूष व लहान मुलगी जखमी झाल्याची प्राथमीक माहिती प्राप्त झाली आहे.

नंदुरबार शहरातील मोठ्या मारूती मंदिराजवळ अमळनेर डेपोची बस अमळनेरहुन नंदुरबारकडे येत होती. आज सकाळी १०:३० सुमारास अपघात घडला. अक्कलकुवा येथील दांपत्य नंदुरबार येथील गवळी वाड्यात लग्नासाठी आले. लग्न घरी देव घेण्याचा कार्यक्रम असल्याने ते घराकडे निघाले होते. वेगात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज आला नाही. मोठ्या मारूती मंदिराच्या बाजुला उतारावर अमळनेर नंदुरबर बस (एम.एच.२०,बी.एल.१४१७) ची व मोटारसायकलची धडक झाल्याने महिला व पुरूषासह बालीका रस्त्यावर फेकल्या गेल्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातात महिलेला गंभीर जखमी झाले. तर पुरूष व बालीकेला दुखापत झाली. महिलेला उपचारासाठी रूग्णावाहिकेव्दारे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात स्थळी पोलिस दाखल झाले त्यांनी रहदारी सुरळीत केली. दरम्यान अपघाताच्या ठिकाणी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here