शॉर्ट सर्किटमुळे वडाळा येथे बंद घराला आग मोठ्या प्रमाणात नुकसान

0
50

देवळा : वडाळा ता देवळा येथे सोमवारी (२३) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बंद घराला शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . रात्री उशिरा अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली .यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी भेट दिली.

फोटो ओळ ; वडाळा ता देवळा येथे आगीच्या भक्ष्यस्थानी बेचिराख झालेले घर (छाया – सोमनाथ जगताप )

याबाबत सविस्तर माहिती अशी की , वडाळा ता देवळा येथील प्रदिप कारभारी सोनवणे यांचे गावांत जुने सागवानी लाकडाचे घर असून, त्याला सोमवारी (२३)रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शॉट सर्किट मुळे भीषण आग लागली . हवेमुळे या आगीने रौद्ररूप धारण केल्याने गावात राहणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले . तरीही आग आटोक्यात येत नसल्याने अखेर अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात येऊन त्यांनी रात्री उशिरा आग आटोक्यात आणली . व गावपरिसरात राहणाऱ्या नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला .

मात्र या आगीत घर पूर्ण जाळून खाक झाले . ही आग वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळेच लागली असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली . गावात विजेच्या तारा लोमकळत असून, शॉट सर्किट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती उपस्थित नागरिकांनी दिली . आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते . यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले . जोरदार वाऱ्यामुळे आग सर्वत्र पसरली . यात जीवितहानी झाली नाही मात्र ,संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून प्रदीप सोनवणे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही केली .

दरम्यान ,महावितरण कंपनीने भिलवाड खर्डा 33/11 KV उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या वाजगाव ,खर्डा, कनकापुर, वडाळा, शेरी, वार्शी, काचने परिसरात वीज वाहिन्यांना अडचणीची ठरणारी झाडे झुडपे तोडण्यासाठी काम हाती घेतले असल्यावर देखील वडाळा येथे शॉर्ट सर्किट मुळे आग लागली . मग ही कामे नक्की झाली की नाही . सोमवारच्या वडाळा गावातील लागलेल्या आगीमुळे नागरिकांनी ही शंका उपस्थित केली आहे, मग जीवितहानी झाल्यावर वीज वितरण कंपनीला जाग येईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . महावितरण कंपनीने तात्काळ याची दखल घेऊन लोमकळत पडलेल्या प्रवाहित तारा दुरुस्त कराव्यात .
गोरख सोनवणे ,ग्रामस्थ वडाळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here