शेतकऱ्यांनो सावध रहा; महाराष्ट्राच्या या भागात आजपासून दोन दिवस पावसाचा इशारा

0
23

द पॉईंट नाऊ ब्युरो : यंदा पावसाळा लवकर येणार असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवलेला आहे. आता आजपासून पुढील दोन दिवसांपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोकण, गोवा, विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी तापमानात घट झालेली आहे. काही ठिकाणी तापमान 40 अंशांच्या वर पोहोचलेले आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडतो आहे. आता पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

देशात बहुतांश राज्यात पावसाने थैमान घातलेले आहे. यामुळे काही अंशी परिस्थिती बिघडलेली आहे. तर महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी झालेले आहे. उष्णतेपासून बहुतांश भागात दिलासा मिळालेला असला, तरी शेतकऱ्यांनी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या पिकांच्या व इतर दृष्टीने सावध राहणे गरजेचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here