विठेवाडी विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी प्रशांत निकम तर व्हा चेअरमन पदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड

0
34
विठेवाडी विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी प्रशांत निकम ,व्हा चेअरमन पदी समाधान निकम यांच्या निवडी प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ व पॅनलचे नेते पंडिराव निकम , दिनकर जाधव ,निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या व राजकीय दृष्ट्या नावाजलेल्या विठेवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी प्रशांत शंकर निकम यांची तर व्हा. चेअरमन पदी समाधान पंडित निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

विठेवाडी विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी प्रशांत निकम ,व्हा चेअरमन पदी समाधान निकम यांच्या निवडी प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ व पॅनलचे नेते पंडिराव निकम , दिनकर जाधव ,निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे आदी ( छाया -सोमनाथ जगताप ) 

या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व देवळा बाजार समितीचे माजी उपसभापती पंडितराव निकम , पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब निकम ,सूत गिरणीचे माजी चेअरमन दिनकर जाधव यांच्या नेतृत्वाखालील गुरुदत्त पॅनलने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे .

सोमवारी( दि २३) रोजी सहायक निबंधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी सभागृहात चेअरमन, व्हा चेअरमन निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती . चेअरमन पदासाठी प्रशांत शंकर निकम यांचा तसेच व्हा चेअरमन पदासाठी समाधान पंडित निकम यांचा निर्धारित वेळेत एक / एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी अनुक्रमे चेअरमन ,व्हा चेअरमन यांची बिनविरोध निवड घोषित केलीं .

याप्रसंगी संचालक सर्वश्री महेंद्र बळवंत आहेर, कुबेर दोधा जाधव , पंडित देवमन निकम ,बाळू फुला सोनवणे ,तानाजी महारु आहेर , शशिकांत श्रीधर निकम , जिभाऊ फुला बोरसे , सुनंदा बापू निकम , सुनीता नंदलाल निकम , अभिजित पंडितराव निकम , कैलास गणपत कोकरे उपस्थित होते . नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला . यावेळी धनाजी निकम , संजय सावळे ,दिलीप निकम ,अशोक आहेर , प्रवीण निकम , ईश्वर निकम ,टिंकू निकम ,मनू आहेर ,भैय्या सावळे ,कमलेश निकम ,सचिन निकम , आत्माराम निकम ,योगेश आहेर , सुनील आहेर ,सचिव संजय निकम,गोरख पवार ,सुभाष पगार आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here