देवळा : गिरणारे (ता. देवळा ) येथील मंजुर घरकुल यादीत मुख्य लाभार्थ्यांना वंचित ठेऊन धनिकांसह ग्रामपंचायत सदस्यांना तसेच यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांना पुन्हा लाभ देण्यात आल्याचा आरोप करत सदरची घरकुल यादी रद्द करुन नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे या मागणीचे लेखी निवेदन यापूर्वी तहसीलदार, गटविकास अधिकारी व देवळा पंचायत समिती सभापती यांना देण्यात आले होते.
मात्र एक ते दिड महिना उलटुनही याबाबत ठोस कारवाई न झाल्याने वंचित लाभार्थ्यांनी आता जिल्हाधिकारींकडे धाव घेतली असुन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व वंचितांना लाभ मिळवून द्यावा अशा आशयाचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवळा तालुक्यातील गिरणारे येथे सन २०२१-२२ या वर्षात आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासकीय यंत्रणेकडून शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार देवरे यांनी अंतिम सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणानुसार १३८ लाभार्थ्यांना पात्र ठरवुन अंतिम घरकुल यादीत समावेश करण्यात आला. परंतु अंतिम यादीत आर्थिक सदन, ग्रामपंचायत सदस्य तसेच यापूर्वी घरकुल योजना लाभ घेतलेल्या नागरिकांचा समावेश असल्याचा आरोप वंचित लाभार्थ्यांनी केला आहे. परिणामी खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बल घटकातील गरजू लाभार्थी या घरकुल योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अंतीम मंजूर झालेली घरकुल यादी येत्या पंधरा दिवसात रद्द करण्यात यावी व नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी विठोबा शिंदे, चंद्रकांत खैरनार, कैलास खैरनार, समाधान खैरनार, रवींद्र खैरनार, सारिका शिंदे, वाल्मीक निकम, शिवाजी खैरनार, नानाजी खैरनार, नानाजी देवरे आदिंनी केली होती.शिवाय अंतिम घरकुल यादी रद्द न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता. मात्र या प्रक्रीयेस एक ते दिड महिना उलटूनही समाधानकारक उत्तर प्राप्त न झाल्याने वंचित लाभार्थ्यांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले असुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन अंतिम मंजूर घरकुल यादी रद्द करण्यात यावी. व नव्याने सर्वेक्षण करून खऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्याना घरकुल योजनेचा लाभ मिळवुन द्यावा अशा आशयाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे.
चुकीच्या सर्वेक्षणामुळे पडताळणीनंतरही घरकुल योजनेपासून वंचित असणाऱ्या खऱ्या लाभार्थ्यांना डावलुन धनिकांसह ग्रामपंचायत सदस्य तसेच यापुर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांचे नावे घरकुल यादीत आलीच कशी असा आरोप घरकुलापासुन वंचित असलेले विठोबा शिंदे यांच्यासह निवेदनकर्त्यांनी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Arjun Chavhan
Arjun Tukaram Chauhan taluka Mahur Shekhapur jila Nanded Maharashtra