निंबोळा येथील विकास संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत” शेतकरी लोकनेते स्व लालजी आप्पा पॅनल” विजयी

0
35
निंबोळा येथील कै लालजी दौलत पाटील विकास संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी उमेदवार जल्लोष करतांना (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; तालुक्यातील निंबोळा येथील कै लालजी दौलत पाटील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत” शेतकरी लोकनेते स्व लालजी आप्पा पॅनलने” सर्व तेरा जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले . तर विरोधी परिवर्तन पॅनलचा साप धुव्वा उडाला .

निंबोळा येथील कै लालजी दौलत पाटील विकास संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी उमेदवार जल्लोष करतांना (छाया – सोमनाथ जगताप )

शनिवारी (दि२१) रोजी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले . मतदानानंतर लागलीच मतमोजणी करण्यात आली .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी अनिल पाटील यांनी कामकाज बघितले .

यात शेतकरी लोकनेते पॅनलचे विजयी उमेदवार गट निहाय पुढीलप्रमाणे व त्यांना कंसात मिळालेली मते

” कर्जदार खातेदार प्रतिनिधी गट ” भाऊसाहेब प्रकाश निकम (२४७),मधुकर नथु निकम (२५०),सुखदेव उखा निकम (२४८),अभिमन तुळशीराम पवार (२५८),दिलीप लालजी पाटील (२८१),आप्पा तानाजी बोरसे (२५९),दत्तू पांडुरंग सावन्त (२६०),विलास भावराव सावन्त (२६०), “इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट ” संजय जीभाऊ निकम (२६४),

“अनुसूचित जमाती गट” दगा संपत शिवदे (२५७) ,”

अनुसूचित जाती जमाती गट” हिरामण तानाजी आहिरे (२७२) याप्रमाणे असून,

देवळा बाजार समितीचे माजी उपसभापती तसेच पॅनलचे नेते व उमेदवार दिलीप लालजी पाटील यांना सर्वाधिक २८१ मते मिळाली आहेत . दरम्यान , महिला राखीव गटातून सुनीता सुभाष निकम ,कमलाबाई धर्माजी निकम यांची याआधी बिनविरोध निवड झाली आहे .या पंचवार्षिक निवडणुकीत “शेतकरी लोकनेते स्व लालजी आप्पा पॅनलने” सर्वच्या सर तेरा जागा जिंकून विकास संस्थेवर आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे .

निवडणूक निकाल घोषित होताच पॅनलच्या विजयी उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला . मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली . कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here