महागाईतून थोडासा सुटकेचा निःश्वास ! पेट्रोल , डिझेल झाले स्वस्त

0
29

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : वाढत्या माहागाईमुळे सर्व सामान्य माणूस पूर्णपणे कोलमडला असतानाच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे, केंद्र सरकारने पेट्रोलचे दर ९.५० तर डिझेलचा दर ७ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून करात कपात केल्याने सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याकडून ह्याबाबत घोषणा झाली आहे.

अर्थमंत्र्यांच्या माहितीप्रमाणे इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे केंद्र सरकारकडून शनिवारी पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर वर ८ रुपयांनी तर डिझेलवर ६ रुपयांनी कपात केली आहे. यामुळे पेट्रोल दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलच्या किंमतीत ७ रुपये प्रति लिटरने कमी होईल अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमती वरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनी या उत्पादनांवरचे उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून हे स्पष्ट केले आहे.

निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे की, “केंद्राने पेट्रोलवरिल ८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटर केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करायचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलची किंमत ९.५ रुपये आणि डिझेलची किंमत ७ रुपयांनी कमी होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here