मालेगाव : येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अली इनामदार यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली.
चर्च गेट ते डी.के. कॉर्नर ते सोयगाव टेहरे चौफुली पर्यंत रोडच्या कामात होत असलेल्या दिरंगाईची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निच्छित करून त्यांचे निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मालेगाव महानगर पालिकेच्या हद्दीत मा. शासन निधीतून चर्च गेट ते डी.के. कॉर्नर ते सोयगाव टेहरे चौफुली पर्यंत सिमेंट काँक्रिट चा रस्ता विकसित होत आहे. सदर मालेगाव महानगराच्या बाहेर निघण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी याचा वापर होतो. सोयगाव परिसरातील पंचवीस ते तीस कॉलनी कडे जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे.
सदर रस्त्याचे काम चार महिन्या पासून सुरू आहे. चांगला रस्ता जे.सी.बी. द्वारे उखडून टाकला आहे. रस्त्यावर खडी पसरून ठेवली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून पायी चालणे देखील मुश्किल झाले असून सदर रस्त्याचे काम टेहरे चौफुली ते दाभाडी या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला देण्यात आलेले आहे. आज रोजी टेहरे चौफुली ते दाभाडी हे काम अपूर्ण असून ते पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. पंधरा ते वीस दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. सोयगाव परिसरात दरवर्षी पावसाचे पाणी साचून नागरिकांना अनेक नागरी समस्यांच्या सामोरे जावे लागत असते. त्यातच रस्त्याचा प्रचंड मोठा त्रासामुळे याठिकाणी मनपा व इतर प्रशासनाला माहत्वाच्या आपत्ती व्यवस्थापन करण्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तसेच रस्ता घाई घाईत पूर्ण करण्यात आल्यास तो योग्य गुणवत्तेचा होऊ शकत नाही. शासनाचा करोडो रुपयांचा निधी यावर खर्च होणार असून त्याचा योग्य विनियोग न झाल्यास त्याचा नागरिकांना काही उपयोग होणार नाही याला जवाबदार सार्वजाणिक बांधकाम अधिकारी असून
सदर टेहरे चौफुली ते दाभाडी काम पूर्ण झाल्यानंतर चर्च गेट ते डी.के. कॉर्नर ते सोयगाव टेहरे चौफुली रस्ता खोदून त्यावर काम सुरू केले पाहिजे होते. किंवा मा. शासन धोरणानुसार कार्यादेश दिल्याप्रमाणे तत्काळ काम करून घेण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे होती. परंतु राजकीय दबावात लोकप्रतीनिधीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता अली इनामदार साहेब यांनी त्यांच्या कर्तव्याचे योग्य निर्वाहन न करता लोकप्रतिनिधीची मर्जी राखण्यासाठी रस्ता उखडून टाकला आहे. नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहनाचे अपघात झाले आहेत. वृद्ध नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
त्याची जबाबदारी उप अभियंता अली इनामदार साहेब यांच्यावर नीच्छित करून त्यांना तत्काळ निलंबित करावे तसेच सदर रस्त्याचे काम त्वरित व दर्जेदार करण्यात यावे या रस्त्याचे काम होत असताना भविष्याचा विचार करून स्ट्रीट लाईट व डिव्हायडर ची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी निखिल पवार, प्रा. अनिल निकम, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, यशवंत खैरनार, विवेक वारुळे, प्रवीण चौधरी, दीपक पाटील, गोपाल सोनवणे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम