राज्यात लवकरच पोलिस भरतीची घंटा वाजणार ! ७ हजार पदांसाठी होणार भरती

0
70

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : पोलिस सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्या तरूणांसाठी एक महत्वाची बातमी आहे, महाराष्ट्र पोलीस मध्ये लवकर ७ हजार पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदाकरिता एकाच वेळी भरती प्रक्रिया होणार आहे.

राज्यात पोलिस कॉन्स्टेबल पदाकरिता ही भरती पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ७ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया होईल त्यानंतर राज्यात आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडेल अशी देखील माहिती समोर आली आहे.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलात ४१६ पदे तातडीमध्ये भरण्यास गृह विभागाने  मान्यता दिली होती.  गडचिरोली जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिस अधीक्षकांना रिकामी पदे भरण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार दीडशे पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक आणि १०५ सशस्त्र पोलिसांची पदे भरण्या करिता ही प्रक्रिया सुरू करावे असे आदेश देण्यात आले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here