पुण्यातील सिंहगडावर ई-बस सेवा पुन्हा सुरू होईपर्यंत गडावर खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकरणामुळे ई-बस सेवा बंद करण्यात आली. ट्टी गडावर जाण्यासाठी आता पर्यंटकांना पुन्हा खासगी वाहने वापरता येणार आहेत.
वन विभागाकडून पर्यायी सुरक्षित घाटमार्गासाठी पाहणी सुरु झाली आहे. सिंहगडावरील अरुंद रस्त्यामुळे बसच्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन अपघात झालेला कठड्याची दुरुस्ती काम सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत गडावर ई-बस सेवा तात्पुरती स्थगितीचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वन आणि पीएमपी प्रशासनाला सोमवारी दिले.
मंगळवारपासून (दि.17 मे) ई-बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. पर्यटनाच्या प्रवासात अडथळा होऊ नये याकरिता ई-बस सेवा पुन्हा सुरू होईपर्यंत खासगी वाहनांना गडावर प्रवेश दिला जाणार आहे. लहान बसेस आणणे, बसेसच्या संख्येच्या तुलनेत चार्जिंग स्टेशन वाढविणे, घाट रस्त्यावरील वळणे तसेच काही भागातील रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करणे, प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करणे अशी कामे केली जाणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम