अवहेलना सोसूनही अस्तित्वासाठी झगडताना समाजासाठीही कार्य करणारी स्री जगासाठी प्रेरणादायी : चाकणकर

0
30

नाशिक प्रतिनिधी : आपण समाजाचे काही देणे लागत आहोत या सेवाभावाने स्वतःच्या अस्तित्वासाठीही झगडत असताना समाजाची अवहेलना सोसूनही त्याच समाजाच्या उत्कर्षासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणारी स्री ही खऱ्या अर्थाने जगासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात सोमवारी (ता.१६) सकाळी १० वाजता द पॉईंट नाऊ या डिजिटल वेब पोर्टलने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शोध घेऊन २२ शिलेदारांना द इंस्पायरिंग यूथ व वूमन अवॉर्ड २०२२ ने सन्मानित केले.

व्यासपीठावर अभिनेते चिन्मय उदगीरकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शिवसंग्रामचे माजी प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, द पॉईंट नाऊ डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक अंकुश सोनवणे, महेश पगारे आदी उपस्थित होते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्यामुळे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित केले. सामाजिक माध्यमांवर व्यक्त होताना काळजी घेतली पाहिजे. तरुण पिढीने नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा. अजमल कसाबला फाशी देण्यात आली हे महत्वाचे नाही तर त्यामागील शक्ती कोण हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल पोर्टलद्वारे व्यक्त होताना आपल्या वृत्त अथवा बातमीचे काय परिणाम होतील, सामाजिक भान ठेऊन याचा विचार करूनच वृत्त प्रकाशित करण्याचे त्यांनी सांगितले. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण जोपासण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी प्रवृत्त करावे असे प्रतिपादन अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले.

याप्रसंगी ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ फेम अभिनेत्री मानसी नाईक हिला अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तर वृषाली कडलग (शैक्षणिक), वाल्मिक देशमुख (सामाजिक), बाळासाहेब अस्वले (कृषी), डॉ. हर्षल तारे (संशोधन), कमलेश पिंगळे (युवा संघटन), योगेश आहेर (सामाजिक), सुमित साळुंखे (कन्स्ट्रक्शन), डॉ. योगिता पवार (वैद्यकीय), मिलिंद चित्ते (राजकीय), माया काळे (सामाजिक), ऋषिकेश शेलार (गायन व संगीत), त्रिवेणी तुंगार (राजकीय), नितीन मोहिते (कोरोनातील उल्लेखनीय काम), प्रमोद मोजाड (सामाजिक), कांतीलाल बोडके (ग्रामविकास), हर्षल सोनवणे (उद्योग व्यवसाय), ऍड. हिरामण वाघ (कृषी), मुनेश ढाके (पर्यावरण), वनिता शिंदे (महिला सबलीकरण), सुभाष नंदन (राजकीय) , संगीता पाटील (महिला सबलीकरण) यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी मी होणार सुपरस्टार फेम राधिका पवार हिच्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर मानसीच्या अदांनी प्रेक्षकांना थिरकावले.

सूत्रसंचालन आरजे गौरव चव्हाण यांनी केले. आभार भूषण सावळा यांनी मानले. तर पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी आपुती बुद्रुकचे सरपंच वैभव तराले, जळगावचे शुभम राजपूत, चेतन जोशी, श्रमिष्ठा जोशी, पीयूष काकुळते, स्नेहा नेरकर, प्रांजली राणे, प्रांजल दिवाकर, सिद्धार्थ गुंजाळ, भूमी पाटील, जान्हवी घांगरे आदिंनी परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here