आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा अपघात; जीवीत हानी नाही

0
191

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला.बस आणि बीएमडब्ल्यूची धडक झाल्याने हा अपघात घडला आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवारी सकाळच्या वेळी रसायनीजवळ हा अपघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला.एसटी बस आणि आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू गाडीचा अपघात घडला. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु जगताप यांचा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईतील कामासाठी जगताप रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला होता. पुढे असणार्या एसटी बसने अचानक लेन बदलल्याने मागून येणाऱ्या जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. बसची मागील बाजू जगताप यांच्या गाडीवर आल्याने हा अपघात घडला आहे.त्यांची बीएमडब्लू गाडी आणि एसटी बसची धडक झाली . अपघाताची तीव्रता भयानक होती.

आमदार संग्राम जगताप सुखरुप आहेत. दरम्यान अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांनी तात्काळ घटनास्ठळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here