वैशाख शुक्ल पक्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण; पहा वेळ

0
39

यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज १६ मे रोजी होणार आहे. हे एक खग्रास चंद्रग्रहण असून आज पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवार,१६ मे रोजी हे चंद्रग्रहण होणार आहे.

भारतीय प्रमाणयवेळेनुसार  ग्रहणाची वेळ सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. तर १० वाजून २३ मिनिटांपर्यंत त्याचा प्रभाव असणारा आहे. अवघ्या १५-१६ दिवसांतच दुसरं ग्रहण असल्यामुळे खगोल अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. आजचे चंद्रग्रहणसुद्धा भारतीय वेळेनुसार दिवसा होणार असल्यामुळे ते भारतातून पाहता येणार नाही.

पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाची पौर्णिमा १५ मे रविवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होणार झाली होती. तर पौर्णिमा १६ मे २०२२ सोमवारी रोजी सकाळी ९. ४३ संपणार आहे. १६ मे रोजी वैशाख पौर्णिमा साजरी होणार आहे.चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळेच सुतक काळही लागू होणार नाहिये.

धार्मिक शास्त्रांत चंद्र ग्रहण हे अशुभ मानले आहे. यासाठी ग्रहणावेळी पुजा,अर्चना करणे, प्रवास आणि खाण्यासारख्या अनेक गोष्टींवर निर्बंध असतात. २०२२ वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण हिंद महासागर, प्रशांत महासागर, अटलांटिक, अंटार्क्टिका, दक्षिण आणि पश्चिम युरोप, दक्षिण आणि पश्चिम आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील काही भागांत हे दिसणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here