देवळा ; परिचारिका दिनानिमित्त खर्डे ता देवळा येथे सामाजिक कार्यकर्ते मधुकर देवरे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .
खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करता काम केले . गुरुवारी (दि १२) रोजी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून खर्डे येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मधुकर बापू देवरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व परिचारिका ,वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली .
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ अलका सपकाळे , डॉ संतोष आडे , पत्रकार सोमनाथ जगताप ,औषध निर्माता धनराज चौधरी,आरोग्य सहाय्यक अनिल गवळे, उद्धव पाटील,आरोग्य सेवक महेश पाटील, प्रशांत सोनवणे, प्रदिप पाठक,श्रीमती सुनंदा निकम,श्रीमती ए.डी सानप,श्रीमती मिनाक्षी पगार,श्रीमती उज्ज्वला सावंत,श्रीमती लक्ष्मी भुसारे, शरद शिरसाठ कनिष्ठ सहाय्यक, प्रथमेश कुवर,परिचर श्रीमती शोभा भदाणे,मयुर क्षिरसागर,विशाल देवरे, भिका पवार ,वाहन चालक सुनिल देवरे आदी उपस्थित होते . प्रास्ताविक व आभार प्रशांत सोनवणे यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम