द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : ताडोबा आणि अंधारी प्रकल्पाबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर आणि पातानील मधील एकूण १३ हत्ती गुजरातमधील जामनगर प्रकल्पात पाठविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे लवकरच हे १३ हत्ती जामनगरला रवाना होणार आहेत. तेथे नवीन तयार होत असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या प्राणिसंग्रहालयात या हत्तींना ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कमलापूर मध्ये असलेल्या आठ हत्तींपैकी चार सुदृढ हत्तींसाठी त्यांच्या संपूर्ण जीवनसाठी नवीन सोयीसुविधा राधे क्रिष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टमार्फत निर्माण करण्यात येणार आहेत. या ट्रस्टने कमलापूर येथे तयार करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे सर्व कारभार सांभाळण्याचे मान्य केले आहे. तसेच सर्व खर्च ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कमलापूर येथील चार सुस्थित असणाऱ्या हत्तींशिवाय कमलापूर, पातानील आणि ताडोबा येथील वृद्ध, अप्रशिक्षित व लहान पिल्ल असे मिळूण १३ हत्ती पाठविण्यात येणार आहेत. या हत्तींचे स्वास्थ्य व उच्च दर्जाच्या वैद्यकीय गोष्टींसाठी प्रशिक्षित व अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी हे उपचाराची सोय व उत्तम आधुनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी, राहण्यासाठी मोकळी जागा असलेल्या जामनगरस्थित राधे क्रिष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट येथे पाठविण्यात येत आहे. त्यांना यापुढे कोणतेही काम दिले जाणार नाही किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा वापर केला जाणार नाही. प्राणिसंग्रहालयाप्रमाणे कोठेही प्रदर्शितही करण्यात येणार नाही.
वन विभागाकडून हे हत्ती जामनगर येथे पाठविण्याकरिता केंद्र शासनाकडून नाहरकत पत्र मिळाले आहे. या सर्व हत्तींची ट्रस्टकडून काळजी घेण्यात येणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वनसंरक्षक युवराज एस. यांनी कळविले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम