राज्यात उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक जणांचा बळी गेला आहे. हवामान विभागानं देखील पश्चिम विदर्भात उष्णतेचा इशारा दिला आहे. नागपुरात उष्मघाताने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कडक उष्णेताचा परिणाम नागपूरसहित अनेक जिल्ह्यात बघायला मिळत आहे.मृत्यूने नागपूरसहित विदर्भात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. उकाड्याने नागरिक हैराण झालेला असताना हवामान विभागानं पश्चिम विदर्भात गुरूवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यात उष्णेतेचा पारा चढता आहे.
यादरम्यान नागपुरात एका रिक्षाचालकाचा रिक्षामध्येच मृतदेह आढळला आहे. सदर रिक्षाचालकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत कळाले आहे. विदर्भातील काही शहरात पुन्हा तापमानाचा उच्चांक नोंदविण्यात आले. दोन दिवस ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान शुक्रवार १३ मेपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असून उष्णतेच्या लाटेचीही शक्यता आहे.
नागपूरच्या उष्माघाताने मृत्यू होण्याचा आकडा दहावर पोहोचला आहे. नाशिक, गाव आणि विदर्भात असे मृत्यू झाल्याचे घटना समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मे महिन्यात नागपूरसह विदर्भात उन्हाच्या तडाखा असाच कायम राहणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम