देवळा : जलजीवन मिशनच्या माध्यमातून मतदार संघात पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहूल आहेर यांनी केले.
मंगळवार (दि.१०) रोजी खुंटेवाडी ता.देवळा येथील विशेष पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व खुंटेवाडी फाटा ते खालप रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते झाले . यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर उपस्थित होते.
आमदार डॉ.आहेर पुढे म्हणाले की, खुंटेवाडी गावाची स्वतंत्र ओळख असून पाणी आणि रस्ता असे दोन्ही प्रश्न आता सुटणार असल्याने गावाच्या प्रगतीला बळ मिळणार आहे. याप्रसंगी माजी सरपंच भाऊसाहेब पगार, देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, अतुल पवार, प्रतीक आहेर, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मोरे, महाजन उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर म्हणाले की, ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पाणी, आरोग्य, रस्ते, वीज यांचे प्रश्न सोडवले जात आहेत. यामुळे विकासाचा अनुशेष भरून निघत आहे.
खुंटेवाडी गावाची सार्वजनिक जमीन नोंदणीच्या कामात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार डॉ.आहेर यांचा सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल सावकार यांनी मनोगत व्यक्त केले. येथील सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी सोसायटीचे माजी चेअरमन आर.टी.पगार, कडूअण्णा पगार, गंगाधर भामरे, नानाजी सावकार, माजी सरपंच केवळराव भामरे, आशाबाई माळी, एकनाथ थोरात, प्रा.बापू रौदळ, उद्धव भामरे, बाळासाहेब भामरे, सावळीराम भामरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ.निंबाजी भामरे, एन.एस.भामरे, तुषार मोरे, हर्षद भामरे, प्रशासक संतोष शेजवळ, ग्रामसेविका पूनम सोनजे, पोलीसपाटील कल्पना भामरे, बाजीराव निकम, राजीव पगार, दिनेश पगार, सम्राट वाघ, शिवाजी पवार, योगेश भामरे, अनिल भामरे, प्रताप पगार, पोस्टमास्टर भिलाजी भामरे, दिगंबर भामरे, उखा सावकार, मनेश गवळी यांच्यासह ग्रामस्थ तसेच महिला बचतगटाच्या सदस्या उपस्थित होत्या. भूषण कुवर, अनिल भामरे, ज्ञानेश्वर भामरे, संदीप पगार, साहेबराव पगार, केदा पवार, मोठाभाऊ भामरे यांनी परिश्रम घेतले. मोठाभाऊ पगार यांनी सूत्रसंचालन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम