दरवर्षी प्रत्येक राज्यांमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षा देत आहे. देशभरातील विविध राज्यांमधील दहावी, बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. तर छत्तीसगड येथील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्तीसगड सरकारने प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वाची घोषणा केली आहे.
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील टॉपर्सना राज्य सरकारतर्फे मोफत हेलिकॉप्टर सफर करण्यात येणार आहे. त्यामागे सरकारचा हेतू असा की मागील येणाऱ्या विद्यार्थी हे पाहून प्रोत्साहित होऊन चांगला अभ्यास करतील. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून निकालाची उत्सुकता देखील लागली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बलरामपूर-रामानुजगंज जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहे.
भूपेश बघेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, सरकारने दहावी-बारावीच्या टॉपर्स विद्यार्थ्यांसाठी मोफत उड्डाण योजना सुरु केली आहे. त्यानुसार दहावी-बारावीतील टॉपर्स विद्यार्थ्यांना सरकार आपल्यावतीने मोफत हेलिकॉप्टर राईड देईल. त्यासाठी संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देखील पाठविण्यात येणार आहेत. छत्तीसगड बोर्डाच्या परीक्षेत साधारण साडेसहा लाख उमेदवार बसले होते.२ लाख ९३ हजार ६८५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. दुसरीकडे दहावीच्या परीक्षेसाठी ३ लाख ८० हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
मोफत हेलिकॉप्टर राईड योजना हुशार विद्यार्थ्यांचे मनोबल आणि प्रतिष्ठा वाढेल तसेच मागच्या इयत्तेतील विद्यार्थी देखील त्यांच्यापासून प्रेरणा घेतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल पुढील १५ दिवसांत कधीही जाहीर केले जाऊ शकतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम