मुंबई सत्र न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा जामीन काल मंजूर केला आहे. तब्बल १२ दिवसांनंतर राणा दाम्पत्यांना तरुंगातून बाहेर आले आहेत. दोन्ही बाजूंकडून गुरुवारी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे जामीनपत्र बोरिवली न्यायालयात जमा करण्यात आले.
आज ५ मे रोजी नवनीत राणांनाची भायखळा तरुंगातून सुटका झाली. नवनीत राणाची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानेच्या दुखण्यामुळे त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. राणा दाम्पत्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर बोलण्याची बंदी घातली असून अटीसह न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राजद्रोह गुन्हा अंतर्गत २३ एप्रिल त्यांना अटक केली होती. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने २४ एप्रिल रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला होता. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर २ मे रोजी निकाल लिहून पूर्ण न झाल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने आज ५ मे निकाल राखून ठेवला होता.
राणा दाम्पत्यांना ५० हजाराच्या जामीनपत्रावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या रवी राणा यांच्या १७ तर नवनीत राणा यांच्या ७ गुन्हे दाखल झाले आहे. सध्या नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणा तळोजा कारागृहात होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम