द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील वाखारी गटाच्या सदस्य नूतन आहेर यांना नुकतीच अहमदाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान करण्यात आली. ‘नेल्सन मंडेला’ विद्यापीठातर्फे ही पदवी देण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हाद मोदी सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या हस्ते नूतन आहेर यांना सामाजिक ,राजकिय, प्रशासन व ग्रामविकास क्षेत्रातील कामगिरी बद्दल ही पदवी प्रदान केली आहे.
अहमदाबाद येथे हॉटेल ताज स्कायलाईन येथे झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान देण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती अभिनेत्री मंदिरा बेदी, गुजरातचे डीआयजी अनिल पधारिया, केंद्रीय मंत्री रामदास आठवले , भजन सम्राट अनुम जलोटा , यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आहेर यांचे सर्वत्र कौतुक
या सन्मानानंतर नूतन आहेर यांच्यावर सर्वत्र कौतुक होत असून, राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भ्रमणध्वनी वरून अभिनंदन केले आहे.
आहेर यांनी गेल्या पंचवार्षिक पासून तालुक्यात झंझावात निर्माण केला आहे. आहेर यांनी अनेक उध्वस्त संसार देखील बसवले आहेत, महिला आयोग च्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना आधार दिला आहे. याच त्यांची कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे.
शेतकरी कुटुंबातील गृहिणी, समाज सेविका ते उत्कृष्ट राजकारणी असा अल्पावधीतच केलेला सफल प्रवास सर्वांनाच थक्क करून सोडणारा आहे अश्या लढाऊ बाणाच्या खंबीर महिला म्हणजेच सौ नूतन सुनील आहेर, शिक्षण-B.A. रा. देवळा, ता. देवळा जि. नाशिक (महाराष्ट्र)
थोडक्यात कार्याचा आढावा
१) सन २०१४ मध्ये पती श्री सुनील आहेर यांच्या खंबीर साथ व सहकार्याने देवळा येथे पीडित महिलांना न्याय देण्यासाठी महिला मदत व समुपदेशन केंद्राची स्थापना केली.
२) सन २०१४ ते २०२० पर्यंत या केंद्राच्या माध्यमातून हजारो विवाहित जोडप्यांचे संसार पुन्हा फुलविले यात बहुतांशी पती-पत्नी यांची न्यायालयात खटला दाखल असलेली देखील प्रकरणे होती.
३) समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून अनेक लोक संपर्कात आल्याने विविध सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण झाल्याने ते प्रश्न हाताळण्याची संधी मिळाली व त्या संधीचे सोने करत त्यांनी फारच मोठे सामाजिक काम उभे केले.
४) त्यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांना सण २०१५ मध्ये “यंदाचे मानकरी” तर २०१६ मध्ये”युवा प्रताप समाज” भूषण पुरस्कार सन २०१७ मध्ये पुन्हा “समाज भूषण”असे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले.
५) फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागल्या त्यात सामान्य जनतेच्या अति आग्रहामुळे त्यांना ती निवडणूक लढवावी लागली व जनतेने त्यांना “न भूतो न भविष्यते” असा विजय प्राप्त करून दिला व त्यांचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश झाला.
६) सामाजिक कार्याची आवड हा त्यांचा पिंडच असल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना राजकारण न करता 100% सामाजिक दृष्टिकोन ठेवल्याने त्यांच्या वाखारी या जिल्हा परिषद गटात भरीव असे विकास कामे झाली यात जनतेच्या मूलभूत गरजा व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी जाणीवपूर्वक प्राधान्य दिले जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य ही त्या असल्याने शिक्षण विभागातील सुधारणा व सुविधा यावर देखील विशेष भर त्यांनी दिला.
७) त्यांच्या कामाचा आवाका व धडाडी बघून त्यांची सन २०१८ मध्ये जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली तर २०१९ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून नेमणूक झाली तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र यावर देवळा तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली याच दरम्यान त्यांच्या कामाची हातोटी व राजकारणावरील पकड व त्यातून साधलेला जनतेच्या विकास या बद्दल सन २०१८ मध्ये त्यांना राज्यस्तरीय असा “सह्याद्री राज्यकर्ता” हा पुरस्कार देण्यात आला.
८) जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, पाणी व रस्ता या विकास कामांवर भर देत त्यांच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विधानसभा सदस्याला ही लाजवेल असे तब्बल 42 कोटींचे विकास कामे गटात पूर्ण केले आहे.
९) पूर्णवेळ सामान्य जनते सोबतचा त्यांचा वावर, अफाट जनसंपर्क व विकास कामे यामुळेच त्यांच्या गटातील २३ गावातील जवळपास ६५ ते ७० हजार लोकसंख्या असलेल्या जनतेतील जवळ जवळ सर्वच ८ ते १० वर्षांच्या बालकांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांना व्यक्तीगत ओळखतात कदाचित अशा त्या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव लोक प्रतिनिधी असतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम