पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेल्या असताना एक महत्वाची बातमी येत आहे. देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग २९ दिवस वाढ केली नव्हती त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. आज नवीन दर आज कंपनीने जाहीर केले आहे. तेल कंपन्यांनी 6 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती.
6 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ केली होती. वास्तविक, 22 मार्चपासून सुरू झालेली पेट्रोल आणि डिझेलची किंमत 14 वेळा वाढल्यानंतर थांबली आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या 14 दरवाढीमध्ये पेट्रोल आणि डिझेल 10 रुपयांनी महागले आहे. गेल्या महिनाभरापासून तेलाच्या दरात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे, तर त्यापूर्वी सुमारे दहा रुपयांची वाढ करण्यात आली होती.
एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. . दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सर्व सामान्य माणसाला जगन मुश्किल झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम