कर्जावरील हप्त्यात ०.४० टक्के होणार वाढ, रिझर्व्ह बँकेचेची घोषणा

0
12

भारतीय नागरिकांनसाठी सर्वात मोठी बातमी. ५ मे चलन विषयक धोरण समितीची बैठक पार पडली. यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वित्तीय बाजारातील चढ उतारामुळे रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केल्याचे सांगितले आहे.

रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या व्याज दराने वित्त पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हणतात. सामान्यांना आणखी एक मोठा फटका बसणार आहे. वाढत्या महागाई बरोबर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जाच्या हप्त्याच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. गेले बराच काळ महागाई रिझर्व्ह बँकेने अनेक महिन्यांमध्ये रेपो दरांत वाढ केली नाही.

२२ मे २०२० मध्ये रेपो दरात शेवटचा बदल करण्यात आला होता. तेव्हापासून रेपो दर ४ टक्क्यांवर स्थिर होता, परंतु आता महागाईच्या पार्श्वभूमीवर रेपो दर ४.४० टक्के करण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांना कर्ज घेणे महागणार आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीच्या आपत्कालीन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आरबीआयची चलनविषयक धोरण समितीची बुधवारी अचानक बैठक पार पडली. मागील बैठकीतच आरबीआयने पहिल्या तिमाहीत महागाई दर ६.३ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ५ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ५.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.१ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. या व्याजदर वाढीमुळे सामान्य नागरिकांच्या घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार आहे. गेल्या महिन्यात रशिया-युक्रेन युद्धामुळे देशात कच्च्या तेलापासून ते पोलादाच्या वाढलेल्या दरापर्यंत सर्वच वस्तू व सेवा महागल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here