मेष राशी भविष्य / Aries Horoscope: घरच्यांना वेळ द्याल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. वेळेचे नियोजन करावे लागेल. वाद टाळण्यासाठी हुशारी आणि संयम दाखवावा लागेल. आर्थिक नियोजन करावे लागेल. काही जणांच्या मागे लागून रखडलेली कामं करुन घ्यावी लागतील. शुभ रंग – किरमिजी
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. घरच्यांना वेळ द्याल. घरी आणि कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वेळेची कसरत सांभाळून सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. नवे शिकणे प्रगती करणे हिताचे. शुभ रंग – आकाशी
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: तब्येत जपा. अध्यात्मिक प्रगतीचा योग आहे. वेळेचे नियोजन करुन जबाबदारी ओळखून ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हिताचे. थांबला तो संपला हे लक्षात ठेवा. चांगल्यासाठी पुढाकार घेणे फायद्याचे. शुभ रंग – पोपटी
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: आर्थिक नियोजन, गुंतवणूक आणि खर्च यांचा तोल सांभाळणे ही कसरत करावी लागेल. वाद टाळणे, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी मन एकाग्र करणे आवश्यक. तब्येत जपा. क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. शुभ रंग – पांढरा
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: हुशारीने आव्हाने पार कराल. शत्रूवर मात कराल. वाद टाळणे हिताचे. समोरच्याचे ऐकून आणि समजून घेणे काही वेळा फायद्याचे. संघटीत होऊन आव्हान पार करण्याचे कौशल्य दाखवावे लागेल. शुभ रंग – गुलाबी
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: जबाबदारी वाढेल पण हुशारीने कामं कराल. गृहित धरणे सोडा. हुशारीने संवाद साधण्यावर भर द्या. संवादातून तिढा सोडवू शकाल. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. लांबचा विचार करून कामं करणे हिताचे. शुभ रंग – हिरवा
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: घरच्यांना वेळ द्याल आणि घरातले प्रश्न हुशारीने सोडवाल. वेळेचे नियोजन हिताचे. कायदा-नियम पाळणे हिताचे. संवादातून प्रश्न सोडविणे हिताचे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेले आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक फायदा देणार. शुभ रंग – निळा
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: कायदा-नियम पाळणे, व्यवहार चातुर्य जपणे, वेळेचे नियोजन करणे हिताचे. आर्थिक नियोजन फायद्याचे. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला हिताचा. तब्येत जपा. वाद टाळणे फायद्याचे. विरोधकांना नामोहरम कराल. शुभ रंग – नारिंगी
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: तब्येत जपा. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. वाद टाळणे हिताचे. जबाबदाऱ्या वाढतील. नवी आव्हाने स्वीकारुन पूर्ण कराल. विरोधकांची हुशारीने कोंडी कराल. कायदा-नियम पाळणे हिताचे. शुभ रंग – पिवळा
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: क्षमता ओळखून जबाबदारी स्वीकारणे आणि पूर्ण करणे हिताचे. आर्थिक नियोजन फायद्याचे. वाद टाळणे लाभाचे. आपल्यामुळे गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. इतरांचा आदर करा आणि त्यांचे ऐकून घ्या. सर्व बाजू समजून घेऊन निर्णय घ्या. शुभ रंग – काळा
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: वाद टाळणे, घरच्यांना वेळ देणे, ज्येष्ठांची काळजी घेणे हिताचे. क्षमता ओळखून कामातले कतृत्व दाखविणे हिताचे. कायदा आणि नियम पळा शुभ रंग – तपकिरी
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. कायदा आणि नियम पळा शुभ रंग – सोनेरी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम