एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन सप्तरंग २  के २२ उत्साहात संपन्न.

0
15

विष्णु थोरे – चांदवड : येथील नॅक मानांकित ‘अ ‘ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित  स्व.सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सप्तरंग २ के २२  या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा व श्री. झुंबरलालजी भंडारी हे उपस्थित होते.  सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन  व संस्थेचे संस्थापक पूज्य श्री. काकाजी यांच्या प्रतिमा पूजनाने  करण्यात आली.

संस्थेचे तांत्रिक सल्लागार डॉ.  आर. जी.  ताथेड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी व सर्व विभागप्रमुख   आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  श्री. दिनेशकुमारजी लोढा व श्री झुंबरलालजी भंडारी यांनी  सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आपल्या अंगभूत कला गुणांचे प्रदर्शन करत उत्कृष्ट प्रकारचे गायन, वादन , नृत्य व समूह नृत्य आदी  सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

तसेच  या स्नेहसंमेलना अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे परीक्षण जेष्ठ गायिका सौ. रेखा महाजन व श्री. अमोल शिंदे यांनी केले.

या स्नेहसंमेलनाचे आयोजन स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. ठाकरे एस. एस. व त्यांच्या संपूर्ण टीमने  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी. कोकाटे व उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली  केले. प्रसंगी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

सदर कार्याक्रमचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या  विश्वस्त समितेचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व  श्री. सुनीलकुमारजी चोपडा आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here