राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील दिलेल्या मशीदीवरील भोंग्याच्या अल्टिमेट वरून चांगलाच गोंधळ सुरू आहे. जोधपूर येथे दोन गटांमध्ये चांगलाच रडा झाला आहे. यात पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलेला आहे संतप्त जमाव ऐकत नसल्याने अनेक अडथळे निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर दंगल होण्याचे संकेत निर्माण झाले. महाराष्ट्रात सर्वत्र पोलिस तैनात करण्यात आली आहेत.
सोमवारी रात्री जोधपूरमधील जालोरी गेट चौकातील स्वातंत्र्यसैनिक बाळ मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर ध्वज बसविण्यावरून आणि मंडळावर ईदशी संबंधित बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वादाला सुरुवात झाली. गटात दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाने झेंडे आणि बॅनर काढून टाकले. यावेळी सक्रिय जमावाने चौकाचौकात अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. दगडफेक केली, लाऊडस्पीकर लावून गर्दी उसळल्याने पोलिसांनी हल्लेखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौम्य पोलीस बळाचा वापर केला
रात्रीपासूनचं हल्लखोरांना पांगवण्यासाठी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. जालोरी गेट आणि ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आणि शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय ईदच्या नमाजासाठी चौकाचौकात लाऊडस्पीकर लावण्यावरूनही संतप्त नागरिक जमा झाले. यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत घातल्यानंतर प्रकरण शांत झाले. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा दगडफेकीचे वृत्त समोर आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम