शरीराला वयानुसार किती झोप आवश्यक ? जाणून घ्या…..

0
25

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : दिवसभराच्या कामानंतर शरीराला विश्रांती ही आवश्यक असते. त्याने मानसिक व शारीरिक स्वास्थ्य निरोगी रहावे यासाठी झोप घेणे गरजेचे असते. मात्र आपल्याला दिवसात किती वेळ झोपावं हे माहीत आहे का ? झोपेची मर्यादा वयानुसार ठरते हे कधी ऐकल आहे का ? पाहायला गेलं तर झोपेचा कोणताही परिपूर्ण कालावधी नसतो, झोप विविध घटकांवर अवलंबून असते आणि वय हा त्यातील मुख्य घटक आहे. नॅशनल स्लीप फाऊंडेशन मार्फत झोपे बद्दलची प्रत्येक वयानुसार मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.

वजात बाळ (०-३ महिने) :

मानसिक व शारीरिक विकासासाठी नवजात बालकांना झोप फार महत्वाची असते. त्यामुळे प्रौढांपेक्षा नवजात बालकांची झोप जास्त असावी. नवजात बालकाला साधारणतः दररोज १४ ते १७ तासांची आवश्यक आहे.

शिशु (४-११ महिने) : 

चौथ्या महिन्यापासून बाळाच्या झोपेत बदल होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. बाळ जास्त वेळ जागे राहते. या कालावधीला ‘ चार महिन्यांचे प्रतिगमन ‘ असे म्हणतात. या काळात १२ ते १५ तासांची नियमित झोप आवश्यक असते.

१-२ वर्ष वयोगटातील बालके : 

या वयादरम्यान दररोज साधारणपणे 11-14 तासांची झोप असावी. या वयानंतर बालकांची झोपेची गरज हळूहळू कमी होत जाईल. यावेळी त्याने दिवसापेक्षा रात्री जास्त झोपावे.

३-५ वयोगटातील बालके : 

या वयात १० ते १३ तास झोपणे गरजेचे असते. त्यांना १० ते १३ तास रात्रीची झोप लागते. हळूहळू वेळ कमी होत जाईल.

शालेय वयाची मुल (६-१३ वर्षे) : 

या वयात दररोज झोप 9-11 तास असावी. या वयात गृहपाठ आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांत मुलं व्यग्र असतात, त्यामुळे झोपण्याची वेळ निश्चित करणे आणि झोपण्याच्या वेळेची नियमित सवय लागू करणे महत्त्वाचे आहे.

किशोरवयीन मुलं (14-17) : 

दररोज 8-10 तास झोप असावी. किशोरवयीन मुलांची झोपेची वेळ सुनिश्चित नसते. ते सहसा रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, ज्यामुळे त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

प्रौढ 1 (18-25 वर्षे) : 

या वयात झोप ही दररोज 7-9 तास असावी. कामाच्या ताणामुळे झोप पूर्ण होणे गरजेचे आहे.

प्रौढ (26-64 वर्षे) : 

7-9 तास झोप घेणं आवश्यक आहे. पुरेशी झोप न घेतल्यास झोपेचं नियमन करण्याशी संबंधित व्हेंट्रोलेटरल प्रीऑप्टिक न्यूक्लियस नावाचा न्यूरॉन्सचा एक समूह तुमचे वय वाढत असताना हळूहळू नष्ट होऊ शकतो.

वृद्ध (६५+वर्षे) : 

अनेक वृद्धांना त्यांच्या गरजेपेक्षा कमी झोप मिळते. याचे कारण असे की त्यांना अनेकदा झोपेचा त्रास होतो. वृद्ध लोकांना किमान पाच तासांची झोप आवश्यक असते. परंतु त्यांनाही साधारणपणे 7-8 तासांची झोप आवश्यक असते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here