मुंबईकरानो उघडा डोळे ! बोरिवली दहिसर परिसरात दोन दिवस पाणीपुरवठा कपात

0
29

मुंबईत बोरिवली पश्चिम परिसरातील ऑरा हॉटेल समोरील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस 1500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कामांकरिता परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 5 मे आणि 6 मे दोन दिवस येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी नोंद घ्यावी. खडक उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची जास्त आवश्यकता भासते परंतु दुरुस्तीच्या कामाकरता महानगरपालिकेने नागरिकांची माफी मागितली आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘ आर मध्य’ विभाग परिसरातील वल्लभ नगर आउटलेट जलवाहिनी वळवण्याचे काम गुरुवार होणार आहे. 1500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीच्या दुरुस्ती करता पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. बोरिवली पश्चिम भागातील 5 मे रात्री 11.55 वाजल्यापासून शुक्रवार 6 मे रात्री 11.55 वाजेपर्यंत काम सुरू असणार आहे. या कालावधीमध्ये आणि पुरवठा कपात केला जाईल त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे योग्य साठा करून ठेवण्याचे आव्हान महानगरपालिकेने दिले आहे.

बोरिवली पश्चिम ‘आर मध्य’ आणि ‘आर उत्तर’ विभागातील काही चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा व संपूर्ण बोरिवली या भागात पाणीपुरवठ्या बंद केला जाईल. कामामुळे 6 मे रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढे एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गांव, कांदरपाडा, लिंक रोड व संपूर्ण दहिसर (पश्चिम) देखील पाणी पुरवठा कपात असणार आहे. 5 मे आणि 6 मे रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सर्व संबंधीत विभागातील नागरिकांना या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी खबरदारी घेऊन पाणीपुरवठा करून ठेवावा पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवण्याचे आवाहन देखील महानगरपालिकेने केले आहे. कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here