देवळा ; खालप ता देवळा येथील युवा उद्योजक शेतकरी कैलास आनंदा देवरे यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल आदर्श शेतकरी पुरस्काराने कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
महाराष्ट्र दिनी (दि १ ) मे रोजी नाशिक येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकरी , शेतकरी गट यांचा गौरव करण्यात आला . यात खालप ता देवळा येथील युवा उदयोजक शेतकरी कैलास देवरे यांनी कृषी पूरक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या बद्दल आत्मा नाशिक मार्फत सण २०२१/२२ साठी आदर्श शेतकरी पुरस्कारसाठी निवड करण्यात आली . राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते देवरे यांना १ मे रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,दिंडोरी रॉड ,नाशिक येथे सन्मानित करण्यात आले .
यावेळी जि प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , जिल्हा कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते . देवरे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम