CBI अधिकाऱ्यांला ‘आयफोन-12’ ची लाच ; देशमुखांच्या वकिलाचा प्रताप

0
27

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांनी चक्क सीबीआय अधिकाऱ्याला आयफोन-12 ची लाच दिली. व अहवाल लिक करून देशमुख निर्दोष आहेत हे भासवण्याचा प्रताप केला. मात्र हे बिंग लवकर फुटलं व होती नव्हती अब्रू चव्हाट्यावर आली.

100 कोटी वसुलीच्या प्रकरणात परमबीरसिंह यांनी आरोप केल्यानंतर, देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. CBI , ED ह्या केंद्रीय यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत. यातून ते निर्दोष सुटणे कठीण असतांना, त्यांनी सर्व पर्याय अवलंबले आहेत. आता तर त्यांनी हद्द पार करून आपल्या वकिलांन मार्फत थेट सीबीआय अधिकाऱ्यांना लाच दिली, मात्र त्याचे भिंग फुटले.

या प्रकरणामुळे राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी तोंडघशी पडली आहे. गेल्या आठवड्यात मीडिया मध्ये तसेच सोशल मीडियावर देशमुख निर्दोष असल्याचा कांगावा करणयात येत होता. मात्र या अहवालात फेरफार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून देशमुखांचे वकील आनंद डागा व सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारी यांना सीबीआय ने ताब्यात घेतले आहे.

अशा वागण्यामुळे सर्व यंत्रणा बदनाम होत असून सर्व्यांनी किमान पदाची गरिमा राखण गरजेचे आहे. भविष्यात सर्वसामान्यांचा विश्वास उडेल अस वागू नये अधिकाऱ्यांनी इतकीच अपेक्षा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here