Nashik : नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी….

0
21

नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक जणांना आपला जीव गमावा लागला आहे. तर कित्येकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातून अनेक बिबटे पिंजरा बंद करण्यात आले असले तरी देखील बिबट्यांची दहशत काही थांबण्याचे नाव घेत नाही.

असाच काहीसा प्रकार दिंडोरी तालुक्यातील परमोरी या ठिकाणी पुन्हा एकदा उघडकिस आला आहे. या ठिकाणी एका नरभक्षक बिबट्याने नववर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल आहे. यामुळे दिंडोरी परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास परमोरी येथील मॅकडॉवेल कंपनीच्या जवळच असलेल्या ओहळा जवळ अश्विनी लहू पवार ही नववर्षीय बालिका खेळत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानकपणे हल्ला केला, यावेळी चिमुकलीने आरडा ओरड करताच बिबट्याने धूम ठोकली. मात्र यात अश्विनी गंभीर जखमी झाली आहे.

अश्विनीचा आरडा ओरड ऐकल्यानंतर आजूबाजूच्या शेतात काम करत असलेले शेतकरी तिच्या मदतीला धावून आले यावेळी तिला दिंडोरी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिच्या जखमा खोलवर असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेने संपूर्ण दिंडोरी परिसरात खळबळ उडाली असून आत्तापर्यंत परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन बालकांचा बळी गेला आहे. या ठिकाणी बिबट्या दिसून येण्याची संख्या देखील मोठी आहे. यामुळे परिसरामध्ये नेहमीच दहशतीचे वातावरण असतं. दरम्यान आता वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी परमोरीचे सरपंच दीपक केदारे आणि ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here