द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (बागलाण) : बागलाण तालुक्यात बस आणि ट्रॅक्टरच्या धडकेत 9 प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. खिरमानी फाटा येथे हा अपघात शुक्रवारी घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाची नाशिक-लोणखेडी या बसला खिरमानी फाटा येथे एका ट्रॅक्टरने धडक दिल्याने 9 प्रवासी जखमी झाले. ही बस नाशिकहून निघालेली होती. मात्र एका वेगात आलेल्या ट्रॅक्टरने या बसला धडक दिली. दारम्यान, जखमी प्रवाशांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
या अपघातात आसखेडा येथील गुजाबाई श्रावण पवार, धमणार येथील वंदना भामरे, उशाबाई खैरनार, सुमन सोनवणे, निर्मला भास्कर पाटील, कल्पना गोविंद कासार आणि साक्री तालुक्याच्या खोरी येथील पंडित दौलत शिंदे, अनुसया पंडित शिंदे हे प्रवासी जखमी झालेले आहेत. वेगात आलेल्या ट्रॅक्टरने बसच्या चालकाच्या बाजूने धडक दिली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम