सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : खर्डे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी बुधवार ( दि ३०) रोजी माघारीच्या अंतिम दिवशी ५२ उमदेवारी अर्जापैकी २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत . अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांनी दिली .
खर्डे विकास सोसायटीसाठी मंगळवारी (दि . १५ ) रोजी छाननी करण्यात आली ,यात दोन अर्ज अवैध ठरविण्यात आली . तर ५२ अर्ज वैध ठरविण्यात आले होते . निवडणूक बिनविरोध होईल असा कयास बांधण्यात आला होता . मात्र तो फोल ठरला . बुधवारी ( ३० ) रोजी माघारीच्या दिवशी ५२ पैकी २६ उमेदवारांनी आपले अर्ज माघे घेतल्याने आता १३ जागांसाठी २६ उमदेवार समोरासमोर उभे ठाकले आहेत .
गट निहाय उमेदवार पुढील प्रमाणे ; (“सर्वसाधारण गट”) ; मांगु गोविंदा गांगुर्डे , रामदास नामदेव गांगुर्डे ,तुकाराम शामभाऊ चव्हाण , कारभारी पंडित जाधव ,दोधा रामभाऊ जाधव ,वसंत लखा जाधव ,हंसराज नारायण जाधव ,माधव रामदास ठोंबरे ,अनिल भाऊराव देवरे ,दातात्रेय वामन देवरे ,भरत बाबुराव देवरे ,सोमनाथ मोतीराम देवरे ,पुंजाराम महादू पवार ,रमेश वामन पवार ,विष्णू जयराम पवार ,सुभाष मुरलीधर मोरे , (अनुसूचित जाती जमाती गट )- दादाजी पोपट जाधव ,उत्तम भिका थोरात ,(महिला प्रतिनिधी गट) – निर्मला तानाजी गांगुर्डे ,दीपाली कृष्णा जाधव ,मीराबाई वसंत जाधव ,जयश्री संदीप देवरे , (इतर मागास प्रतिनिधी गट) – दतात्रेय जगन्नाथ जाधव ,संदीप अशोक पवार , (भटक्या विमुक्त जाती जमाती गट) – रामकृष्ण धोंडू कुवर , युवराज बाबुराव मोरे याप्रमाणे आहेत .
खर्डे विकास सोसायटीच्या १३ जागांसाठी येत्या १० एप्रिल रोजी मतदान घेण्यात येऊन ,त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे . दोन पॅनलमध्ये समोरासमोर होणाऱ्या या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण गावासह तालुक्याचे लक्ष लागून आहे . येन उन्हाळ्यात सोसायटी निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याने गावात राजकिय वातावरण तापणार आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम