द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेनेच्या 8 नेत्यांना अटक होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारC मधील नेत्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यात नुकतेच पुण्यात किरीट सोमय्या आल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यादरम्यान किरीट सोमय्या हे पायऱ्यांवर पडले होते. त्यावेळी सोमय्या यांनी ‘शिवसेनेच्या गुंडांनी आपल्यावर हल्ला केला’ असे म्हटले होते.
यातीलच 8 जणांना अटक होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. शिवाजीनगर येथील पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
यामुळे आता नेमके काय होते? हे लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम