द पॉईंट नाऊ ब्युरो : पश्चिम बंगाल येथे 8 लोकांना जिवंत जाळल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी केंद्राने 72 तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांनी हत्त्या झाल्यानंतर बिरभूम जिल्ह्यातील रामपूरघाट येथे तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी घरांचे बाहेरून दरवाजे लावून आग लावण्यात आली होती. यात 8 जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आता याबाबत सविस्तर चौकशी अहवाल येत्या 72 तासांत सादर करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.
आता यात काय अहवाल सादर केला जातो, दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम