Cheetah death in kuno : कुनो नॅशनल पार्क मध्ये असलेल्या सातव्या चित्याचा मृत्यू..

0
38

7th cheetah death in kuno national park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकन चित्त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या सातव्या चित्याचा नुकताच मृत्यू झाला आहे. तेजस असे मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याचे नाव आहे. कुनो नॅशनल पार्क मध्ये सप्टेंबर 2022 ते जुलै 2023 या 5 महिन्यांत 7 चित्ते मरण पावले आहेत.

 

कुनोच्या तेजस चित्याच्या मृत्यूबाबत मिळालेल्या वृत्तानुसार, पथकाला सकाळी 11 वाजता तेजस चित्याच्या मानेवर खोल जखमेच्या खुणा दिसल्या. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना बोलावून योग्य परवानग्या घेऊन तेजसला बेशुद्ध करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी व पथक त्याठिकाणी पोहोचले मात्र दुपारी दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला होता.

 

फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’चा संरक्षित खुल्या पिंजऱ्यात मृतदेह आढळून आला. चार वर्षांच्या ‘तेजस’चा भांडणामध्ये मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे कुनोमधील ज्येष्ठ वनाधिकारी जे. एस. चौहान यांनी सांगितले.

 

९ मे रोजी ‘दक्षा’ या मादीच्या मृत्यूनंतर चित्त्यांना जंगलात सोडण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. ९ जुलै रोजी ‘प्रभाश’ आणि ‘पावक’ या दोन चित्त्यांना जंगलामध्ये मोकळे सोडण्यात आल्यानंतर पुन्हा ही घटना घडली.

 

२७ मार्च रोजी ‘साशा’ या चित्त्याच्या मादीचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर २३ एप्रिल रोजी ‘उदय’ याचा तर ९ मे रोजी ‘दक्षा’ हिचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक वर्षांनी भारतात जन्मलेल्या ‘ज्वाला’च्या चार बछडय़ांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. ‘तेजस’ हा चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दगावलेला सातवा चित्ता असल्यामुळे या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here