द पॉईंट नाऊ विशेष ; देवळा नगरपंचायत रणधुमाळी सुरू असून काही पक्षांनी खाजगी संस्थांकडून सर्व्ह करून त्यांच्यामार्फत तगडे उमेदवारांचा शोध घेतला जातोय, तर काही पक्ष मात्र समोरील नाराज आपल्या पारड्यात येतात का अशा उमेदवारांच्या शोधात आहे.
या वॉर्डमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याची समस्या गंभीर असून प्रचारात हा मुद्दा कळीचा बनणार आहे, यामुळे फक्त जातीय समिरण न बघता विकासात्मक दृष्टीने हे वॉर्ड मध्ये मतदान होणार आहे.
वॉर्ड क्रमांक 7 हा अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने याठिकाणी चुरस कमी असेल अस वाटत असतांनाच या वॉर्डात मोठी चुरस दिसतेय , भाजपा तर्फे इच्छुक माळवाडीचे माजी सरपंच काशिनाथ अहिरे ,उल्हास गुजरे, कैलास पवार, यांच्या नावांची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी तर्फे मनोज गुजरे ,कृष्णा अहिरे यांच्या नावांची चर्चा आहे. तर शिवसंग्राम देखील याठिकाणी स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपा तर्फे इच्छुक असणाऱ्यांमध्ये कामाचा अनुभव असलेले काशिनाथ अहिरे हे या वॉर्डात प्रभाव पाडू शकतात, कारण त्यांचे वास्तव्य देखील याच वॉर्डात आहे, तसे भाजपचे बाकी इच्छुक इतर वॉर्डात वास्तव्यास आहेत, यामुळे काशिनाथ अहिरेंची दावेदारी प्रबळ मानली जातेय. त्यांचा कामाचा अनुभव व मितभाषी स्वभाव त्यांना मदत करणारा आहे. त्याच बरोबरीने उल्हास गुजरे यांना उमेदवारी दिल्यास इतर वॉर्डात त्यांचा फायदा होऊ शकतो, कैलास पवार दे देखील भाजपा तर्फे इच्छुक आहेत, यात उल्हास गुजरेंना याआधी संधी देऊन झालीय म्हणून भापजा पुन्हा त्यांना संधी देणार की नवं नेतृत्व पुढे आणणार हे बघणं महत्वाचे आहे.
राष्ट्रवादी तर्फे मनोज गुजरे व कृष्णा अहिरे हे इच्छुक आहेत, दोघीही राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने राष्ट्रवादीला तिकीट देतांना कसरत करावी लागणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार यातील कृष्णा अहिरे यांनी थेट पालकमंत्र्यांना तिकिटासाठी गळ घातल्याची माहिती आहे. यात मनोज गुजरे स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांच्या जवळचे असल्याने पक्ष नेतृत्वासमोर पेच उभा राहणार आहे, राष्ट्रवादी कोणाच्या पारड्यात आपले तिकीट टाकते हे बघणं महत्वाचे आहे.
या वॉर्डात एकलव्य वस्तीचे सरासरी 115 च्या आसपास मतदान आहे तसेच किशोर नगरचे जवळपास 280 पर्यत मतदान आहे तर नवीन रोहिदास नगरचे सरासरी 92 पर्यत मतदार आहेत. यामुळे फक्त समाजावर मतदान मिळणार नसून, या वॉर्डात सर्व जाती, जमातींचे मतदान आहे, यामुळे प्रभावी प्रचार विकासाचे मुद्दे अजेंडे यावरच उमेदवाराचे भविष्य अवलंबून असणार आहे.
या वॉर्डचा प्रभाव हा 10 नंबर च्या मतदारांवर होणार आहे, यामुळे 10 न. वॉर्ड मध्ये जो उमेदवार जातीय समीकरणाना मदत करेल तो उमेदवार 7 ला असेल हे ही नक्की आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम