आजकाल टांझानियन भावंडं कायली पॉल आणि तिची बहीण निमा यांची फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूप चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडमधल्या गाण्यांवर बनवलेले रील्स व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये डान्स , लिप-सिंकला अनेकजन पसंत करतात. टांझानियन कायली पॉल आणि बहीण नीमासोबत ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
सोशल मीडियावर, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये टांझानियन कायली पॉल बॉलीवूड चित्रपट तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांची गाणी आणि संवादांवर लिप-सिंक व्हिडिओ बनवताना दिसत आहे. पारंपारिक मसाई ड्रेसमध्ये दिसणारा काइली पॉल वेगळ्या शैलीने भारतीयांची मने जिंकताना दिसत आहे. त्याने नुकताच सुपरस्टार ‘KGF Chapter 2’ चित्रपटच्या डायलॉगवर लिप-सिंकसह जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. या व्हिडिओला 3.4 दशलक्षाहून अधिक दृश्ये प्राप्त झाली आहेत. त्याचवेळी 6 लाख युजर्सनी त्याला लाईक केले आहे.
या चित्रपटातील एका डायलॉगवर काइली पॉल लिपसिंक करताना दिसत आहे. आपल्या वेगळ्या स्टाईलने सर्वांना आश्चर्यचकित केले. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. तर त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. काइली पॉलचे इंस्टाग्रामवर 2.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी 259 हजार लोक त्याची बहीण नीमा पॉलला फॉलो करतात. लोकांना लिपसिंग आणि तिची डान्स स्टाईल आवडली आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला. तेव्हापासून भाऊ-बहीण ही जोडी इंटरनेट सेन्सेशन बनली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम