6 ऑक्टोंबर ला पिंपरीचिंचवड मनपा भवनावर चढून रयत करणार आंदोलन

0
41

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; रयत विद्यार्थी परिषद आंदोलन करणार असल्याने पुन्हा संघर्ष होणार असल्याचे चिन्हे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारातील सर्व खाजगी आणि सरकारी जागेवरील GIS पद्धतीने वृक्ष गणनेचे कामकाज 2018 साली सुरू करण्यात आले. 2 वर्ष वृक्षगणनेचे कामकाज पूर्ण करून 3 वर्षे देखभाल असे 5 वर्षाचे कामकाजाचे स्वरूप होते .परंतु में.टेरेकोन इकोटेक प्रा.लि. या संस्थेने वृक्ष गणनेच्या कामकाजात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेणे केला आहे.

रयत पदाधिकाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा अधिकारी पत्रांना कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाही. या कंपनीने मोठ्या प्रमाणावर पालिकेचा पैसा आणि वेळ वाया घालविला आहे. तीन वेळा लाखो रुपये दंड ठोठावूनही आणि एक वेळा मुदतवाढ देऊनही दिलेल्या मुदतीत. वृक्षगणनेचे कामकाज पूर्ण न झाल्यामुळे सदर ठेकेदारास कामकाजातील विनाकारण विलंब, अनियमितता यामुळे. वृक्ष गणनेचे कामकाज पूर्ण होण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे.

जागतिक वायू बदलाचे परिणाम महाराष्ट्र राज्य पुर स्वरूपात पाहत आहे. वृक्ष जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्यामुळे उपलब्ध वृक्षांची गणना करून ते जतन करण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने रयत विद्यार्थी परिषदेने 12 ऑगस्ट रोजी दिवसभर उद्यान विभागातील झाडांवर बसून आंदोलन केले , त्यावेळी आम्ही सुभाष इंगळे यांच्या बरोबर चर्चा केली, 7 दिवसांत ठोस कारवाई करू असे सांगितले होते. दोन महिने उलटून गेले आहेत तरीही उद्यान विभाग आणि उपायुक्त सुभाष इंगळे यांनी कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही.

पालिकेकडून पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे असे दिसते .आम्हा विद्यार्थ्यांना वृक्ष गणना संदर्भात माहिती घ्यायची असल्यास निदर्शने, उपोषणे, आंदोलने किंवा कुठेतरी झाडांवर चढून आंदोलन करावे लागते . आयुक्त यांची भेट मिळते त्या भेटीत देखिल सकारात्मक उत्तरे दिली जात नाही. ड प्रभागातील ज्यु इंजिनिअर वर्षा कदम यांनी पिंपळे निलख येथील वृक्ष तोड केली त्यास आज 4 महिने उलटून गेले आहेत तरीही त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यांना अधिकरी म्हणून पाठिशी घातले जात आहे का ? याचा खुलासा प्रशासन प्रमुख म्हणून करावा.

रयतच्या प्रमुख मागण्या

में.टेरेकोन इकोटेक प्रा .लि या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.
संबंधित ठेकेदाराकडून 3 लाख 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा.
संबंधित ठेकेदारास पाठिशी घालणा-या अधिका-यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.
ड प्रभागातील ज्यु इंजिनिअर वर्षा कदम यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा किंवा त्यांना 50 हजार दंड ठोठावण्यात यावा.
या आमच्या रयत विद्यार्थी परिषदेच्या मागण्या आहेत.या मागण्या संदर्भात आपण कोणतीही कारवाई न केल्यास आम्ही 6 ऑक्टोंबर रोजी पिंपरी चिंचवड मनपा भवनावर चढून आंदोलन करू याची आपण नोंद घ्यावी.
कळावे .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here