भय्यु महाराजांच्या आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा महत्वाचा निकाल

0
9

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : काही वर्षांपूर्वी देशाला हादरून सोडणारी घटना म्हणजे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj)यांची आत्महत्या. या आत्महत्या प्रकरणात इंदूर न्यायालयानं (Indore Session Court) महत्त्वाचा निकाल दिला असून. महाराजांचा मुख्य सेवक विनायक व चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. सेवकांनी केलेल्या छळामुळेच भय्यू महाराजांनी (Bhaiyyu Maharaj)आत्महत्या (suicide)केल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं आहे. या निकालानंतर भक्तांनी समाधान व्यक्त केले असून त्यांना अजून कठोर शिक्षा हवी होती अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

आज निकाल देतांना न्यायालयाचे मुख्य सेवक विनायक दुधाले, चालक शरद देशमुख आणि केअर टेकर पलक पुराणिक यांना दोषी ठरवले आहे. या सर्वांना 6-6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा कमी असली तरी न्याय मिळाल्याची भावना भक्त परिवारात आहे.

चार वर्षापूर्वी भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिघं आरोपींना जानेवारी २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयात साडे तीन वर्षे सुनावणी चालली. न्यायमूर्ती धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक असलेल्या शरद देशमुख, विनायक दुधाले आणि पलक पुराणिक यांना महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात दोषी ठरवलं. या तिघांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल केलं, असं न्यायमूर्तींनी निकाल देताना म्हटले आहेत. भय्यु महाराज आत्महत्या करतील असे कधी कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते मात्र हे घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

काही सेवकांवर भय्यू महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबीयांपेक्षा जास्त महत्त्व दिलं. त्यांच्यावर खूप विश्वास टाकला. आपल्या आश्रमाची आणि कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली, त्याच सेवकांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. हा छळ इतका जास्त होता की त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असं सोनी यांनी निकाल सुनावताना म्हटलं आहे. ,

पलकचा भय्यू महाराजांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

तीनही आरोपी महाराजांची संपत्ती हडपण्याच्या प्रयत्नात होते. आरोपींनी मोठं षडयंत्र रचलं होतं. त्याच माध्यमातून त्यांनी भय्यू महाराज आणि पलक यांचे अनेक अश्लील फोटो बनवले होते. तेच फोटो दाखवून भय्यू महाराजांना धमकी दिली जायची. त्यामुळे भय्यू महाराज प्रचंड खचले. अखेर त्यांनी नैराश्यात जावून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

पलक एवढी खतरनाक होती की तिने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करुन आश्रमच्या तिजोरी आणि दानपेटीवर ताबा मिळवला होता. एवढंच नाही तर तिने भय्यू महाराजांच्या घराच्या किल्ल्या देखील आपल्या हातात घेतल्या होत्या. ती सर्वांसमोर स्वत:ला भय्यू महाराजांची मुलगी असल्याचं भासवायची. पण वास्तव्यात ती भय्यू यांच्यासोबत प्रेयसी असल्यासारखं वागायची. ती आणि विनायक दर महिन्याला भय्यू महाराजांकडून दीड लाख रुपये वसूल करायचे. या सर्व प्रकाराला वैतागून महाराजांनी आपले आयुष्य संपवले होते. अखेर आरोपींना शिक्षा होऊन महाराजांना काही प्रमाणात न्याय मिळाला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here