धक्कादायक! कुटुंबातील 5 जणांनी एकाच वेळी गळफास घेत केली आत्महत्या

0
18

द पॉईंट नाऊ ब्युरो : बिहारमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

विद्यापतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील मऊ गावाच्या ऑटो चालवणारे मनोज झा आणि त्यांच्या कुटुंबाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. घरात असलेल्या आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली असावी, असा गावकऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे. मृतांमध्ये 45 वर्षीय मनोज झा, त्याची आई 65 वर्षीय सीता देवी, पत्नी 38 वर्षीय सुंदरमनी देवी, मुले 10 वर्षीय सत्यम कुमार आणि 7 वर्षीय शिवम कुमार अशी मृतांची नावे आहेत.

मनोज झा यांची मुलगी निभा माहेरी आलेली होती व आपल्या पतीसोबत दुसऱ्या खोलीत होती. सकाळी झोपेतून उठून बाहेर आल्यावर तिच्या हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here