Nashik news | नाशिक जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळे आज दुष्काळसदृष्य म्हणून घोषित करण्यात आली. मंत्रालयात नैसर्गिक आपत्तीमध्ये आपतग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते.
दुष्काळ व्यवस्थापन संहीतेनुसार ज्या तालुक्यांमध्ये मध्यम किंवा गंभीर दुष्काळी परिस्थितीची शक्यता आहे. अशा ४० तालुक्यांमध्ये यापूर्वीच Trigger-2 लागु झाला आहे. त्यानुसार यापूर्वीच ४० तालुक्यांतील २६९ महसुली मंडळात दुष्काळ लागु झाला आहे. यात नाशिक जिल्हयातील येवला, सिन्नर आणि मालेगावचा समावेश झाला होता.
नाशिक जिल्हयात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. उशिरा पाउस पडल्याने पेरणीही उशिरा झाली. पेरणी नंतर चार ते पाच आठवडे पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही पाउस न झाल्याने कापूस, मका, कांदा, भूईमुग, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
Nashik News | इटलीच्या यांत्रिकी झाडुंनी होणार नाशिकची सफाई
पाणी पातळीत घट झाली आहे. अनेक गांवांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विचार करता लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत नाशिकच्या जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळांपैकी निफाड तालुक्यातील लासलगाव, देवगाव, नांदूर-मध्यमेश्वर, निफाड, चांदोरी, रानवड, पिंपळगाव बसवंत, सायखेडा, ओझर हे तर नांदगाव तालुक्यातील नांदगाव, मनमाड, वेहेलगाव, जातेगाव, हिसवळ बुद्रुक, ह्या मंडलांचा समावेश आहे.
नाशिक तालुक्यातील नाशिक, देवळाली, पाथर्डी, माडसांगवी, मखमलाबाद, शिंदे, सातपूर, गिरणारे, हे तर कळवण तालुक्यातील कळवण, नविबेज, मोकभनगी, कनाशी ही मांडले आहेत. बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर ह्यांचा समावेश आहे.
Nashik News | केंद्र सरकारने ग्राहकांना फुटक कांदा द्यावा पण शेतकऱ्यांचे शोषण करू नये – आ. बनकर
चांदवड तालुक्यातील चांदवड, रायपूर, दुगाव, वडनेर भैरव, वडाळी भोई, दिघवद हे तर देवळा तालुक्यातील देवळा, लोहोनेर, उमराणे ह्या ४६ महसूल मंडळांचा दुष्काळसदृश म्हणून सामावेश करण्यात आला आहे. या महसुली मंडळातील गावांना दुष्काळी भागातील गावांसाठी देय असलेल्या सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नवीन निर्माण झालेल्या काही महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र नाही त्या मंडळांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून या समितीची पुन्हा बैठक घेऊन उरलेल्या महसूल मंडळांचा देखील सामावेश आम्ही लवकरात लवकर या यादीमध्ये करु.– छगन भूजबळ ( अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम