द पॉईंट नाऊ ब्युरो : पेठ-सांगली रस्त्यावर एक अपघात होऊन चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कारला मागून डंपरने धडक दिल्याने हा अपघात होऊन एकाच कुटुंबातील चौघे जण जागीच गतप्राण झाले. शनिवारी (26 मार्च) ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर येथील व्यावसायिक अधिकराव पोळ हे आपल्या कुटुंबासमवेत सांगलवाडी येथे एका कार्यक्रमास जात असताना पेठ-सांगली रस्त्यावर गाताडवाडी नजीक हा अपघात घडला.
अधिकराव पोळ हे त्यांच्या आई गीताबाई पोळ, पत्नी सुष्मा पोळ, भावजायी सरिता सुभाष पोळ आणि पुतणीसह (नाव समजू शकले नाही) कार्यक्रमास आपल्या कार मधून निघाले होते. मात्र त्यांच्या पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने, पोळ यांनी देखील ब्रेक दाबला. यामुळे मागून येणाऱ्या डंपरने पोळ यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. यात पोळ यांची कार दोन वाहनांच्या मध्ये दाबली गेल्याने अधिकराव पोळ यांच्यासह त्यांच्या आई, पत्नी भावजायी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पुतणी थोडक्यात वाचली. याबाबत पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम