अफगाणिस्तानमधून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. उत्तर अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ शहरातील मशिदीत मोठा विस्फोट झालाय आहे. या स्फोटात अनेकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. ५० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं गुरुवारी स्थानिक तालिबान कमांडरच्या हवाल्यानं ही माहिती दिलीय. मजार-ए-शरीफ येथील मशिदीमध्ये एकूण 4 स्फोट झाल्याचं सांगण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला असून कमीत कमी २० मृतदेह आणि ६५ जखमीं असून अबू अली सिना बाल्खी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मजार-ए-शरीफच्या तालिबान कमांडरचे प्रवक्ते आसिफ वजेरी माहिती दिली की, ‘तुरुंगातील शिया मशिदीत हा बॉम्बस्फोट झालाय. मजार-ए-शरीफशिवाय काबूल, नांगरहार आणि कुंदुजमध्येही स्फोट झाले आहे. या स्फोटात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येनं लोक जखमी झालेत. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम