झिरवाळांची बातच न्यारी, म्हणे भाऊ ‘सॅनिटायझर पेक्षा मोहाची भारी’

0
19

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ;  ‘आमचा आदिवासी म्हणजे शास्त्रज्ञ आणि सॅनिटायझर पेक्षा मोहाची भारी!’ हे वाक्य आहे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे.

औचित्य होतं, राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या सभेचं. शरद पवार हे नुकतेच नाशिक दौऱ्यावर होते.

या दरम्यान इगतपुरी येथे त्यांची सभा पार पडली.

या सभेमध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचं हे वाक्य, सर्वांनाच हसवून गेलं. मोहाची भारी, म्हणजे मोहापासून निर्माण केलेली दारू.

आणि कोरोनाला सॅनिटायझर पेक्ष्या मोहाची भारी पडते. असं झिरवाळ या सभे मध्ये म्हटले.

शास्त्रज्ञ म्हणतात की, सॅनिटायझर मध्ये 50% अल्कोहोल असते,पण मोहा मध्ये मात्र 100% अल्कोहोल असते, असं झिरवाळ म्हणाले. त्यांचं हे वाक्य सर्वांनाच हसवून गेलं.

झिरवाळ म्हटले खरे, पण तसे खरच या मोहाचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत बरका!

या मोहाची फुलं तशी जास्त कालावधी साठी उपलब्ध नसतात. आणि जास्त टिकत ही नाहीत. पण ही फुलं फायदेशीर देखील तितकीच.

या मोहाच्या फुलांमध्ये, सुक्रोज, ग्लुकोज असे विविध घटक असतात. ही फुलं म्हणजे ‘अ’ आणि ‘क’ जीवन सत्वाचा भरपूर स्रोत आहेत.

या मोहाच्या फुलांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे अनेक प्रकारच्या आजरांवरील औषधांमध्ये देखील त्याचा उपयोग केला जातो.

मद्याच्या निर्मितीमध्ये या फुलांचा भरपूर प्रमाणात वापर होतो. आणि ही फुलं अशीच सुद्धा भरपूर प्रमाणात खाल्ली जातात. कारण त्यात शर्करा प्रमाण देखील भरपूर आहे.

डोके दुःखी, डोळ्यांचे आजार, त्वचा यांमध्ये फुलांचा रस वापरला जातो. तर कफ, खोकला, दम्यासाठी सुद्धा ही फुलं खुप उपयुक्त ठरतात.

या मोहाच्या फुलांची भुकटी हगवण आजारावर देखील उपयुक्त ठरते. असे या मोहाचे खुप सारे औषधी गुणधर्म आहेत.

म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे भाषणातील बोलणे, तसे टाळण्यासारखे देखील नाही.

नरहरी झिरवाळ हे स्वतः आदिवासी आहेत. आणि ते राहत असलेल्या भागात, अर्थात दिंडोरी.

त्याच सोबत त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा अशा भागात या मोहाच्या फुलांचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो.

अशी ही मोहाची फुलं खूप गुणकारी आहेत. त्यामुळे तुम्हांला सुद्धा जर ही फुलं कुठे मिळाली, तर नक्कीच तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता.

कारण ही फुलं गोड असल्या कारणाने, ती अशीही खाल्ली जातात.

म्हणून मिळालीच संधी, तर नक्की खाऊन सुद्धा बघा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here