द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; अश्लीलतेचा कळस गाठणं हे गलिच्छ प्रवृत्तीच्या लोकांच्या पाचवीलाच पूजलेलं असतं. असाच प्रकार देवळा तालुक्यात घडलाय.
देवळा तालुक्यातील निवान बारी येथे असाच अश्लील आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ज्यात संशयित आरोपीने 48 वर्षीय महिलेवर अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
सदर प्रकार हा 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला. ज्यात संशयित आरोपी हा फिर्यादी महिलेस आपल्या दुचाकी वरून घेऊन जात असतांना, तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली.
सदर फिर्यादी महिलेस बोलत असतांना, तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली. तसेच महिलेच्या गुप्तांगास स्पर्श करत, अक्षरशः किळस येईल या प्रकारे वक्तव्य केली. आणि विनयभंग केला.
या कारणास्तव संबंधित संशयित आरोपीवर देवळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय दंड विधान कलम 354 (अ) 1 (1) (2) (4) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
सदर संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यास अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.
या घटनेमुळे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित संशयित आरोपी आणि फिर्यादी यांचे नेमके नाते काय? संबंधित फिर्यादी महिला संशयिता सोबत का गेली? संशयिताने अश्लील शेरेबाजी करण्याचे कारण काय? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
गुन्हा दाखल करण्यात आलेला संबंधित व्यक्ती हा देवळा तालुक्यातल्या खर्डे येथील आंबेकर वस्तीतील रहिवासी आहे.
आता संबंधित संशयितावर कारवाई केली जाते का? काय कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
ही बातमी आपण वाचलीत का?
कंगना राणावत (Kangana Raanavat) हिने, नुकतेच भारताला 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य (Freedom) हे भीक होते आणि खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे म्हटले.
कंगणाच्या या वक्तव्यामुळे, तिच्यावर सर्व क्षेत्रातून टीका झाली. याच तिच्या वक्तव्या मुळे तिच्यावर, पुण्या (Pune) मध्ये दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंगना राणावत ही मागील बऱ्याच कालावधी पासून, भाजप (BJP) प्रणित केंद्र सरकारचे किंबहुना भाजप चे समर्थन प्रत्येक ठिकाणी करतांना दिसत आहे.
भाजप 2014 साली सत्तेत आला. आणि याच हवाल्यावर, तिने भारताला खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाल्याचे म्हटले.
कंगनाची होणार तुरुंगात रवानगी? स्वातंत्र्याबाबत गैर वक्तव्य भोवले https://thepointnow.in/?p=2713
https://chat.whatsapp.com/BRENOPKW2DkJ4qhKCEoRYS
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम