26 वर्षांनी भेटले बालपणीचे मित्र ; देवळा येथे स्नेह आयोजन

0
59

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुलच्या इयत्ता १० वीच्या १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी ( दि ७) रोजी संपन्न झाला . तब्बल २६ वर्षानंतर वर्ग मित्र एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला .

देवळा येथे आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याप्रसंगी उपस्थित डॉ ललित मेतकर डॉ त्रंबक देवरे विनोद आहेर आदींसह माजी विद्यार्थी छाया सोमनाथ जगताप

स्नेह मेळाव्यानिमित व्यवसाय ,कामानिमित्त दुरावलेले मित्र यानिमित्ताने एकत्र आले . मैत्रीच्या खऱ्या खुऱ्या भावनांना पुनर्जीवित केले. ६८ विद्यार्थी आयोजित स्नेह मेळावा कार्यक्रमासाठी उपस्थित होते .सत्कार ,स्नेह भोजन, गप्पा ,गोष्टी हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली व पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वांनी एकमेकांना नोरोप दिला. भेटल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र द्विगुणित झाला होता. हा आनंद शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नसल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या. आयुष्यात काहीही झाले तरी मैत्री इतके पवित्र नाते नाही असे गौरउद्गार उपस्थितांनी काढले. या भेटीसाठी अनेक मित्रांनी एकत्र येऊन परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

अनेक दिवसांपासून एकत्र येण्याचे नियोजन करत होते, मात्र एकत्र येन शक्य होत नव्हते मात्र, काही मित्रांनी पुढाकार घेऊन हा क्षण जुळवून आणला. यामुळे जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. गेल्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाल्याने, आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. आजही हे बंध कायम असल्याने प्रत्यकाने समाधान व्यक्त केले. मैत्रीच्या या शिदोरीत वैचारिक लयलूट देखील करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी असलेले सर्व मित्र एकत्र आल्याने सर्व बालपणीच्या आठवणीत न्याहाळून निघाले.

याप्रसंगी डॉ योगेश बच्छाव, दावल आहेर,अभिमन आहेर, किरण अलिटकर ,मनोज देवरे, सचिन धारणकर , दादाजी आहेर ,जयपाल हिरे, सुधीर निकम ,संदीप अहिरराव आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते . मेळाव्याचे नियोजन डॉ. ललित मेतकर, विनोद आहेर, डॉ. त्र्यम्बक देवरे यांनी केले होते . जातांना सर्व मित्रांनी मात्र आनंदाची शिदोरी सोबत नेली.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here