द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (बागलाण) : सटाणा येथिल पोलिसांनी विशेष कारवाई करत कांद्याचा ट्रक घेऊन परस्पर पसार झालेल्या हरियाणाच्या तिघांना ताब्यात घेतले आहे.
सटाणा येथे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते. आणि येथून मोठ्या प्रमाणावर कांदा बाहेर जात असतो. इथल्या एका व्यापाऱ्याचा 25 टन कांदा ट्रक मध्ये तर भरला, मात्र तो इच्छित स्थळी पोहोचलाच नाही. हा कांदा ज्या ट्रक मध्ये भरला, तो ट्रकच घेऊन तिघे जण पसार झाले होते. याबाबत पोलिसांनी कारवाई करत अखेर तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही जण हरियाणा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
सटाणा येथील कांदा व्यापारी महेश कोठावदे यांनी आपला 25 टन कांदा ट्रक मध्ये भरला आणि तो चेन्नई कडे रवाना केला होता. मात्र ट्रक चालकाने तो कांद्याने भरलेला ट्रक दुसरीकडे वळवत तो पसार झाला. याबाबत कोठावदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघांनाही 20 डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी मिळालेल्या महत्वपूर्ण माहितीसह संबंधित तिघांनाही वापी येथून ट्रकसह ताब्यात घेतले. वाजीद मदी, सोहेल मदी आणि अर्षद खान अशा तिघांनाही ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलीस अधिकारी सचिन पाटील, वर्षा जाधव, अजय महाजन, धनंजय बैरागी, भाऊसाहेब माळी आदींच्या पथकाने ही महत्वपूर्ण कामगिरी करत कारवाई केली.
या कारवाई साठी सटाणा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत सर्व व्यापारी वर्गाने आभार देखील मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम