APMC Market बाबत दिले महत्त्वाचे आदेश; शिवसेनेच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

0
30
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत Lasalgaon APMC Market शेतकऱ्यांना होत असलेल्या गैरसोयी विषयी शिवसेनेने मुख्यमंत्री CM एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना सुविधा पुरवाव्यात असे आदेश दिलेले आहेत.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत या सोयीने सर्व ६३ बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची काम करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून उत्तम सोयी-सुविधांची निर्मिती करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सोयी-सुविधा तयार कराव्यात. पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते इत्यादि सुविधांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करणे.

HSC-SSC Exam Update | बोर्डाने घेतला मोठा निर्णय

सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पणन विभागाचा आढावा घेण्यात आला. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्य वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. यावेळी वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कामकाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here