HSC-SSC Exam Update | बोर्डाने घेतला मोठा निर्णय

0
19
CBSE Exam 2024
CBSE Exam 2024

­ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान, दहावी व बारावी लेखी परीक्षा (SSC-HSC Exam) घेतल्या जाणार आहेत. परंतु, त्याआधी बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) परीक्षा केंद्रांवर (Examination Centre) प्रवेश देण्यात येऊ नये असे आदेश केंद्रांना देण्यात आलेले आहेत. यापूर्वी एखाद्या परिस्थितीत दहा मिनिटे उशीर झाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. परंतु, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत.

Union Budget 2023 | करदात्यांना दिलासा; ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

या निर्णयामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपरला मुकावे लागू शकते. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेण्यात येणारी दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता होणार आहे.परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रकदेखील मंडळाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

हा निर्णय घेण्याचे नक्की कारण काय?

उशीरा येण्याच्या सवलतीचा फायदा घेऊन लेखी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here