gautam adani: अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजार वाढला पण अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये घसरण

0
18
Gautam Adani
Gautam Adani

gautam adani : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यानंतर शेअर बाजार तेजीत उघडला. सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समध्ये (snensex) सुमारे 1000 अंकांची वाढ दिसून आली. दिवसाअखेर तो केवळ 158 अंकांच्या वाढीसह 59,708 वर बंद झाला. परंतु गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांची आज पुन्हा जोरदार विक्री झाली. गौतम अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सुमारे 28 टक्क्यांनी घसरले व ₹ 846 च्या घसरणीनंतर 2129 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

घसरण कायम राहिली

अदानी समूहाचे अदानी पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन शेअर्स ₹ 109 रुपयांनी घसरले. हा शेअर सुमारे 18 टक्क्यांनी घसरून ₹ 504 वर आला. अदानी ट्रान्समिशन लिमिटेडचे ​​शेअर्स सुमारे 1 टक्क्यांनी कमकुवत नोंदवत होते व ते ₹ 14 घसरून 1760 रुपयांवर व्यवहार करत होते.अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये पाच टक्के घसरण झाली. हा शेअर ₹ 11 ने घसरून ₹ 212 वर व्यवहार करत होती. अदानी विल्मारचे शेअर्सही पाच टक्क्यांहून अधिक घसरले आणि आता 443 रुपयांवर व्यवहार करत होते.गौतम अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सुमारे 28 टक्क्यांनी घसरले आणि ₹ 846 च्या घसरणीनंतर 2129 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

ग्रीन एनर्जी घसरला

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्ये 5% पेक्षा जास्त घसरण नोंदवली गेली आहे आणि 63 रुपयांनी कमी होऊन 1160 रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये 10 टक्के घसरण झाली. हा शेअर ₹ 210 ने घसरला आणि ₹ 1893 वर व्यापार करत होता.हिंडेनबर्ग या अमेरिकेतल्या कंपनीनं एक रिपोर्ट जाहीर केला. त्या रिपोर्टमध्ये अदानी समुहानं शेअर बाजार हाताळून स्वतःच्या संपत्ती फुगवल्याचा दावा आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर अदानींच्या अनेक कंपन्यांचे शेअर गडगडले. श्रीमंताच्या यादीतून अदानींचा नंबर तिसऱ्या स्थानावरुन थेट 11 व्या स्थानी पोहोचलाय. दरम्यान हे सारे आरोप खोटे असून हिंडेनबर्गचा रिपोर्ट अर्धवट आणि खोट्या माहितीवर आधारित असल्याचा दावा अदानी समुहानं केलाय.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here